Your Own Digital Platform

घंटा वाजली, शाळा भरली नवांगत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन स्वागत


लोणंद : गेल्या दोन महिन्यापासून शाळेत शुकशुकाट होता. मात्र आज सकाळी शाळेचा पहिला दिवस तांबवे तालुका फलटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमानशेठ गणपतराव सुर्यवंशी विद्यालयात सन २०१८ / २०१९ या शैक्षणिक वर्षांमध्ये नवांगत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, चॉकलेट, नवीन मोफत पुस्तके देऊन शाळेचे मुख्याध्यापक मा. सुरेश रिटे, तांबवे गावचे उपसरपंच विशालभाऊ शिंदे प्राध्यापक शशिकांत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर शिंदे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले .शाळेचा पहिलाच दिवस असल्याने मुलांमध्ये अतिउत्साह असल्याचे जाणवले..

शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत नवी पुस्तके आणि खाऊ मिळाल्याने नवांगत विद्यार्थी आनंदीमय झाले होते .मराठी शाळेची व हायस्कूल शाळेची दोन वर्षांची गुणवत्ता पाहून अनेक पालकांनी आपली मुले इंग्रजी शाळेतून काढून प्राथमिक व हायस्कूल शाळेत प्रवेश घेतला.