Your Own Digital Platform

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस १३१७ विद्यार्थी गैरहजर


सातारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा सातारा जिल्ह्यातील 14 केंद्रावर रविवारी पार पडली. 4 हजार 688 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून तब्बल 1 हजार 317 विद्यार्थी परीक्षेस गैरहजर राहिले. सर्वच्या सर्व केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. सातारा जिल्ह्यातील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालय, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, अरविंद गवळी कॉलेज, अनंत इंग्लिश स्कूल, यशोदा टेक्नीकल कॅप्मस, महाराजा सयाजीराव विद्यालय, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, छत्रपती शिवाजी महाविद्यालय, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजे, के.बी.पी. पॉलिटेक्नीक पानमळेवाडी, के.बी.पी. इंजिनिअरींग सदरबझार, कला व वाणिज्य महाविद्यालय या 14 परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वच्या सर्व केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.