रविवारी पाटण मध्ये मोफत करिअर मार्गदर्शन शिबीर


पाटण :- आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्गदर्शनाची गरज लक्षात घेऊन पाटण तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि युनायटेड मराठा और्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य करिअर मार्गदर्शन शिबिर रविवार दिनांक १० जून रोजी सकाळी १० वा. बाळासाहेब देसाई महाविद्यालय पाटण येथे आयोजित करण्यात आले आहे. या मार्गदर्शन शिबिरात चांगले करिअरचे स्वप्न पाहणाऱ्या जास्ती-जास्त विद्यार्थी - विद्यार्थीनींनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या मार्गदर्शन शिबिरात चैतन्य इंगळे- संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक वर्धन्स ग्रुप पुणे, प्रा. विक्रम मगर- असिस्टंट प्रोफेसर सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा, प्रा‌. प्रदिप वराडे- संचालक संकल्प एज्युकेशन अकादमी अहमदनगर, दादासाहेब भोसले- उपशिक्षण अधिकारी सातारा यांचे करिअर संबंधित मार्गदर्शन होणार आहे. या शिबिरात जास्ती-जास्त विद्यार्थी- विद्यार्थीनीं, युवा-युवती यांनी उपस्थित राहून आपले भवितव्य व करिअर संबंधी मार्गदर्शन घ्यावे. हे मार्गदर्शन शिबिर पूर्णतः मोफत असून या शिबिरात सहभागी होणेसाठी यशंतराव जगताप, सचिन देसाई, गणेश जाधव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.