माणच्या तहसिलदार सौ. सुरेखा माने मँडम यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड


म्हसवड : माणच्या तहसिलदार सौ सुरेखा माने मँडम यांची उपजिल्हाधिकारी पदी बढती झाल्याबद्दल त्यांचे माण तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला

माण तालुक्याच्या तहसिलदार सौ सुरेखा माने यांच्या उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांची उपजिल्हाधिकारी पदी बढती करण्यात आली असुन लवकरच त्या या पदावर रूजू होणार आहेत या त्यांच्या उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती बद्दल माण तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने मैडम यांचा सत्कार करण्यात आला,
यावेळी तालुका अध्यक्ष बाळासाहेब मासाळ, जिल्हा उपाध्यक्ष विजय साखरे, म्हसवड शहराध्यक्ष अरविंद पिसे साहेब, किसान मोर्चाचे अध्यक्ष अमृत चौगुले, विजयकुमार पाठक, मंगेश खरात, जयकुमार मोरे, संदिप होनमाने, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मासाळ म्हणाले सौ माने मैडम यांनी तालुक्यात केलेल्या उल्लेखनिय कारभाराची दखल घेवुन त्यांची उपजिल्हाधिकारी पदी बढती करण्यात आली असुन हि गोष्ट माण वासियांसाठी आनंदाची पण आहे व दु:खाची पण आहे कारण येवढ्या कर्तव्यनिष्ठ अधिकारी यापुर्वी माण तालुक्याला लाभल्या नव्हत्या ती सर्व कसर माने मैडम यांनी त्यांच्या कारकिर्दीत भरून काढली आहे कारण आज पाणी फौंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत तालुक्यातील तब्बल ६६ गावांनी सहभाग घेतला होता यात सर्व गावांनी दुष्काळ हटवण्यासाठी जिवतोड मेहनत करून उल्लेखनिय काम केले आहे आणि हे सर्व माने मैडम यांच्या उत्कृष्ठ नियोजनामुळेच त्याना बढती मिळाली हि आनंदाची गोष्ट आहे तसेच त्या आता बढती होऊन बदली होऊन जानार यांचेही दु:ख माणवासियांना होणार असल्याचे मासाळ म्हणाले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.