आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

मायणीत लक्ष्मीनारायण एजन्सीचे दुकान अज्ञात चोरटयांनी फोडून रु. १० लाख किंमतीच्या वस्तू व रोख रक्कम लंपास


मायणी : मायणी ता . खटाव येथील मायणी _कातरखटाव या मुख्य रस्त्यांवरील पश्चिमेच्या बाजूस असलेले वर्दळीच्या चांदणी चौकातील उमेश रंगनाथ मोरे रा. निमसोड ता. खटाव यांच्या मालकीचे शेती उपयोगी उपकरणे विक्रीचे लक्ष्मी नारायण एजन्सीज नावाचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून ९ लाख ७३हजार ६८०रुपयांचा माल व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली असल्याची तक्रार उमेश रघुनाथ मोरे  यांनी मायणी पोलीस दूरक्षेत्रात दाखल केली आहे .
      
    या संदर्भात मायणी  पोलीस दूरक्षेत्राकडून मिळालेली माहिती या प्रमाणे -रात्री ७.३०वांजता मोरे हे दुकान बंद करून आपल्या निमसोड या गावी गेले होते .दरम्यान सायंकाळी ७.३० ते सकाळी ६ या वेळेत अज्ञात चोरट्यांनी सदर दुकान फोडले .सदर दुकानात शेती उपयोगी इलेक्ट्रिक मोटार स्टार्टर ,कॉपर वायर ,केबल वायर आदी वस्तू विक्रीस असतात .चोरट्यांनी बंद शटरचे सेंटरलॉक तोडून उचकटले ,त्याचप्रमाणे आतील कोलॅप्स गेटची जाळी कोणत्यातरी उपकरणाच्या सहाय्याने कापून टाकली . 

तसेच दुकानात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे व डिव्हीआर मशिन घेऊन पोबारा केला .त्याचप्रमाणे दुकानातील रु.३,९६,०००रुपये किमतीचे सबमर्सिबल वाइंडिंग नवीन कॉपर वायर ७०० किलो,  रु.४,८०,०००किमतीचे एल .टी .के .कंपनीचे स्टार्टरचे ४०नग,रु.७२,६८०किमतीचे टेक्समो कंपनीच्या ३०नळाच्या मोटर , रु. ५,०००किंमतीचे इकव्हीजन कंपनीचे सीसीटीव्ही व डिव्हीआर मशिन व रोख रक्कम रु. २०,०००असा एकूण रु.९ लाख७३ हजार६८०रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला .सदर घटनेचा तपास मायणी पोलीस दूरक्षेत्राचे सपोनि एस .डी .गोसावी करीत आहेत .अद्याप याप्रकरणी कोणाही संशयितास अटक करण्यात आली नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले .