Your Own Digital Platform

पावसाचे पाणी दुकानांसह घरात


तळमावले :  तळमावले (ता. पाटण) येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यापार्‍यांची अक्षरश: दैना उडाली. पावसाचे पाणी बसथांबा परिसरातील काही दुकानात शिरले होते. त्याचबरोबर ताईगडेवाडी येथेही काही घरात पाणी शिरले होते. तसेच कराड - ढेबेवाडी मार्गावर झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास विस्कळीत झाली होती.

जोरदार पावसामुळे तळमावलेमधील बसथांबा परिसरात असणार्‍या दोन दुकान गाळ्यात पाणी शिरले होते. याशिवाय अनुष्का कॉस्मेटिक या दुकानतही पाणी शिरले होते. याशिवाय ताईगडेवाडी येथे लालासोा दत्तू ताईगडे, नथुराम रघुनाथ भुलुगडे, छाया किसन काटकर यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरले होते.दरम्यान, तळमावलेमधील ओढा अक्षरश: ओसंडून वाहत होता. ओढ्यातील संपूर्ण घाण पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेली आहे.