Your Own Digital Platform

‘टोबॅको रन’मध्ये सातारकर धावले; दिड हजार जणांचा सहभाग


सातारा : जागतिक कर्करोग दिनानिमित्त रविवारी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटिल सर्वसाधारण जिल्हा रुग्णालयापासून टोबॅको रन ला सुरुवात झाली. 3, 5 आणि 10 किलोमीटर अशी ही रन काढण्यात आली. रनला सातरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

टोबॅको रन मध्ये 1 हजार 500 जणांनी सहभाग घेतला होता. रनचा शुभारंभ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीकांत भोई ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनीत फाळके व अन्य अधिकारी व पदाधिकारी यांच्या हस्ते झाला.