Your Own Digital Platform

महर्षी शिंदे विद्यालयाचा विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल


मायणी : महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य. मंडळामार्फत फेब्रुवारी २०१८मध्ये घेण्यात आलेल्या एच.एस.सी. परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी शिंदे ज्युनियर कॉलेज एनकूळ ता. खटावच्या विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी पुढीलप्रमाणे- प्रथम - कु. खरमाटे प्रियांका विकास ( ६७ टक्के), द्वीतीय- कु. शिंदे सारिका अर्जुन ( ६६ टक्के), तृतीय - कु. खाडे उषा बाळू- (६५ टक्के ).
या विद्यालयाचे हे पाहिले इ.१२वीचे वर्ष असून या विद्यालयाचा इ.१०वीचा निकाल गेले आठ वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे प्राचार्य एस.डी. बोटे व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.