Your Own Digital Platform

जाता लाईट वातावरण होतय टाईट


म्हसवड : सध्या मान्सुन बदलु लागला असुन बदलत्या मान्सुनचा परिणाम वातावरणावर होत असल्याने रोज सोसाट्याचा वारा वाहु लागला आहे, या सोसाट्याचा वार्यामुळे म्हसवड शहरासह परिसरात रोजच विजेचा खेळखंडोबा सुरु झाला असल्याचे चित्र असुन यामुळे रोज रात्री अचानक विज जावु लागली आहे त्यामुळे विज गेल्यावर मात्र वातावरण टाईट होत असल्याची वस्तुस्थिती आहे.

माण तालुक्यात सर्वात महत्वाचे म्हणुन ओळखल्या जाणार्या म्हसवड शहरात सध्या सोसाट्याचा जोरदार वारा वाहत असुन त्याचा परिणाम विजेवर होत आहे यामुळे वारंवार शहरातील बत्ती गुल होवु लागली असुन अचानक विज जाण्याने सर्वकाही ठप्प होत आहे, जरा जरी वारे वाहु लागल्यावर विज कंपणी खबरदारी म्हणुन लगेचच विज पुरवठा खंडीत करीत आहे, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने जिवमात्राची उन्हामुळे तलकी भरत आहे अशा परिस्थितीत जर पंखे, कुलर बंद राहिल्यास तर मात्र जिव नकोसा होत आहे इतकी गरमी होत असुन सध्या ४० ते ४१ अंश डिग्री सेल्सियस तपमान म्हसवडसह परिसरात जाणवत आहे अशावेळी विज गेल्यास माणसाची काय हालत होत असेल याचा विचारही करवत नाही,
काही दिवसांनी उन्हाळा संपुण पावसाळा सुरु होणार आहे पावसाळ्यात वारंवार विजेचा कडकडाट होत असतो त्यावेळी वारंवार विज जाण्याचे प्रकार घडत असतात पावसाळ्यात विजेचे खांब कोसळुन दुर्घटना घडल्याचे प्रकार यापुर्वी अनेकदा घडले आहेत त्यामुळे विज कंपणीने यावर आत्तापासुनच उपाययोजना राबवुन पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

विद्युत वाहिण्यांचा ताण काढणे आवश्यक -

अनेकदा सोसाट्याचा वारा वाहु लागल्यावर दोन विद्युत खांबा दरम्यानच्या विद्युत वाहिण्या ह्या धोकादायक स्थितीत लोंबकळत असल्याने दुर्घटना घडु शकतात या दुर्घटना घडु नयेत यासाठी विज कंपणीने खबदारीचा उपाय म्हणुन विद्युत वाहिण्यांचा ताण काढणे गरजेचे आहे.

वारंवार लाईट जाण्याने होतय व्यावसाईकांचे नुकसान -

शहरात रात्री अपरात्री कधीही विज गायब होण्याचे प्रमाण वाढल्याने त्याचा परिणाम येथील विजेवर अवलंबुन असलेल्या व्यावसायावर होत असुन सतत विज जाण्याने व्यावसाईकांचे अर्थिक नुकसान होत आहे.

लाईट जाण्याने वातावरण होतय टाईट

रोज रात्री शहरात विजेच्या कडकडासह सोसाट्याचा जोरदार वारा वाहत आहे त्यामुळे विज गायब होत असुन विज जाताच वातावरण मात्र भलतेच टाईट होत आहे, याचा परिणाम लहान मुले व बाळांवर होत आहे.