Your Own Digital Platform

डॉ.अभिजीत पाटील फलटणचे डी.वाय.एस.पी.


स्थैर्य, फलटण : फलटणचे डीवायएसपी रमेश चोपडे यांची सोलापूर शहर येथे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नतीने बदली झाली असून त्यांच्या जागी आता डॉ.अभिजीत पाटील फलटण उपविभागाचा कार्यभार सांभाळणार आहेत. 

महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) अधिनियम, 2014 च्या कलम 22 ड व 22 न च्या तरतुदीनुसार सक्षम प्राधीकाराच्या पूर्वमान्यतेने राज्य पोलीस सेवेतील पोलीस उपअधिक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त संवर्गातील बदल्या दि.8 जून 2018 रोजी शासन निर्णय क्रमांक रापसे - 17-18 / प्र.क्र.115 / पोल-1 (अ) या निर्णयानुसार करण्यात आल्या असून राज्यातील पोलीस विभागातील 96 अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये फलटणच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी डॉ.अभिजीत शिवाजीराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून फलटणचे विद्यमान उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे यांची बदली सोलापूर शहरला करण्यात आली आहे. 

विद्यमान डीवायएसपी रमेश चोपडे यांनी त्यांच्या कार्यकाळात फलटण उपविभागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा, सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती, डॉ.आंबेडकर जयंती असे सार्वजनिक उत्सव, विविध समाजाचे भव्य मोर्चे याबरोबरच राज्यातील इतर ठिकाणी घडलेल्या दंगलींच्या पार्श्‍वभूमीवर फलटण उपविभागात रमेश चोपडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून आपली वेगळी छाप उमटविण्यात यश मिळवले आहे.