भाजपाच्यावतीने विशेष संपर्क अभियान राबवणार : डॉ. दिलीप येळगावकर


सातारा : मोदी सरकारची विनाकारण बदनामी केली जात आहे. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात पोहोचवण्यासाठी भाजपाच्यावतीने विशेष संपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात लाभार्थी संमेलन गट, गण निहाय राबवले जाईल. यामध्ये पक्षविरहित बुद्धिजीवी वर्गातील लोकांना एकत्र आणले जाणार आहे. त्याचबरोबर पदाधिकारी नेमणुका करून बुथसंपर्क अभियान तालुकानिहाय राबवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. दिलीप येळगावकर म्हणाले, "साफ नियत सही विकास" या धोरणाने मोदी सरकारने गेल्या चार वर्षात कामकाज केले. या सरकारच्या काळात भ्रष्टाचारावर नव्हे तर कामकाजाच्या पद्धतीवर टीका केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरिबांपर्यंत विकास नेऊन सर्वाना उत्तम राहणीमान दिले. निरोगी भारताची त्यांनी निर्मिती केली. युवा शक्तीच्या बळावर देशाची प्रगती साधली. 

शेतकऱ्यांच्या विविध योजनांना त्यांनी प्राधान्य दिले. सामाजिक न्यायासाठी बांधिलकी जोपासल्याचे सांगत डॉ. येळगावकर यांनी मोदी सरकारने गेल्या चार वर्षात राबवलेल्या योजनांची माहिती दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, जि.प. सदस्य दीपक पवार, अनिल देसाई, महेश शिंदे, नगरसेवक धनंजय जांभळे, दत्ताजी थोरात, विकास गोसावी, अनुप शहा आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.