Your Own Digital Platform

उरमोडीचे पाणी म्हसवड ला न पोहचल्यास रास्ता रोको व म्हसवड बंद


म्हसवड :सध्या उरमोडीचे पाणी हे टंचाईग्रस्त भागाना देण्यासाठी सोडण्यात आलेले असुन या पाण्यासाठी राजकिय मंडळींचा श्रेयवाद उफाळुन आला असुन या श्रेयवादातुनच ते पाणी म्हसवड पर्यंत पोहचण्यासाठी अडचणी निर्माण केल्या जात आहेत, मात्र कोणत्याही परिस्थितीत सदरचे पाणी जर म्हसवड पर्यंत न पोहचल्यास म्हसवड सह परिसरातील सर्व शेतकर्यांनी बंद व रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनास दिला आहे.

याबाबत माजी नगराध्यक्ष विलासराव माने माजी नगरसेवक कैलास भोरे, अनिल पोळ आदींच्या नेतृत्वाखाली आज सातारा जिल्हा पाटबंधारे अधिक्षक पोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे सध्या म्हसवड हद्दीत उरमोडीचे पाणी आले असुन ते आलेले पाणी पुन्हा पळशी गोंदवले भागातील टंचाई भागाला देण्याचा डाव सुरू आहे पंधरा दिवसा पूर्वी दिवड येथील बंधारा भरल्यानंतर म्हसवड भागात येणारे पाणी पुन्हा वडजल ढाकणीला नेहण्यात आल्याने म्हसवडकर फक्त पाण्याकडे बघत बसले आहेत खरेतर वडजल ढाकणी भरल्या नंतर पुन्हा उरमोडीचे पाणी म्हसवड हद्दीत आले असताना ते पाणी गोंदावले व पळशी मार्गाकडे वळवल्यास म्हसवड परिसरातील माणगंगा नदी कोरडी राहणार आहे यामुळे या परिसरातील हजारो हेक्टर शेतीचे नुकसान होणार आहे, वास्तविक सदर पाण्यासाठी भरावे लागणारे पैसे भरण्यास येथील शेतकरी तयार असताना केवळ राजकिय आकसापोटी म्हसवड ला पाणी मिळु नये या हेतुनेच पाण्याची पळवा पळवी सुरु असुन कोणत्याही परिस्थितीत सदरचे पाणी म्हसवड येथिल माणगंगा नदीपात्रात आलेच पाहिजे यासाठी या परिसरातील शेतकरीवर्ग एकवटला असुन पाणी न मिळाल्यास मंगळवारी म्हसवड बंद ठेवून रस्तारोको आंदोलन करण्याच्या इशारा निवेदनाद्वारे प्रशासनास दिला आहे.सदर निवेदनावर बहुतांशी शेतकर्यांच्या सह्या आहेत.

दरम्यान सदरचे पाणी म्हसवड पर्यंत सोडले जावे यासाठी कॉग्रेस कार्यकर्त्यांचे एका शिष्टमंडळाने माण - खटावचे आ. जयकुमार गोरे यांची भेट घेवुन त्यांना यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली आहे या शिष्टमंडळात सुनिल पोरे माजी नगरसेवक बबन अबदागिरे, चंद्रकांत केवटे, जालिंधर पिसे, आदींचा समावेश होता.


शेतकर्यांसाठी म्हसवडकरांच्या लढ्यात सहभागी होणार - बाळासाहेब मासाळ - माण तालुका अध्यक्ष ( भाजप)

सध्या उरमोडीचे पाणी म्हसवड शहरात पोहचु नये यासाठी काहीजण विषेश प्रयत्न करीत आहेत सदरचे पाणी हे आमच्या प्रयत्नामुळे सुटले आहे दुष्काळी भागाला पाणी देण्याची भाजपची भुमीका असताना जर सोडलेल्या पाण्यावरुन कोणी सामान्य जनतेला व शेतकर्यांना वेठीस धरत असेल तर आम्ही जनतेच्या लढ्यात सहभागी होवुन प्रशासनास वेठीस धरु.