Your Own Digital Platform

टायगर ग्रुपच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव


पाटण  : टायगर ग्रुपच्या वतीने बुधवार दिनांक २० जून २०१८ रोजी मल्हारपेठ ता.पाटण येथे मल्हारपेठ विभागातील १८ विद्यालयातील दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देवून गौरविण्यात आले.

टायगर ग्रुप मल्हारपेठ विभागाचे अध्यक्ष पै.सुरज पाटील यांच्या वतीने या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मल्हारपेठ विभागातील 18 विद्यालयांतील दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले .या कार्यक्रमाला सातारा जिल्हा टायगर ग्रुपचे अध्यक्ष मा. सागर दादा शिंदे , कराड तालुका टायगर ग्रुपचे अध्यक्ष

मा.श्री.शशी भाऊ, पुणे टायगर ग्रुपचे अध्यक्ष , मा.पै.सुमितदादा देशमुख. समाजसेवक, मा.श्री गोरखभाऊ नारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमास. टायगर ग्रुप पाटण तालुकाध्यक्ष शंकरभाई साळुंखे, किशोर भांदिर्गे, पै .योगेश माने,बंपी भाऊ, सिद्धेश शंकर भांडुगळे (टायगर ग्रुप चाफळ विभाग)

आदित्य गुरव, पै अक्षयभैया कोळेकर विजय लोहार स्वप्नील देसाई किरण सावंत प्रदीप सावंत इरफान भाई यांच्यासह सबंधित विद्यालयांतील मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग तसेच टायगर ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.