Your Own Digital Platform

अनधिकृत बोअरवेल उत्खनन प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा


महाबळेश्‍वर : महाबळेश्‍वर येथील बॉन व्ह्यू बंगलो येथे अनधिकृत बोअरवेलचे उत्खनन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महाबळेश्‍वर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गावकामगार तलाठी विजय सर्जेराव जाधव यांनी महाबळेश्‍वर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

गावकामगार तलाठी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महाबळेश्‍वर येथील बॉन व्ह्यू बंगलो येथे अनधिकृत बोअरवेलचे उत्खनन केल्याप्रकरणी बोअरवेलचे ठेकेदार यतिराज कदम (रा. सातारा) बोअरवेल मालट्रक (क्र.के.ए 01 झेड 1549) चे मालक सेंथिल कुमार (रा. तामिळनाडू), चालक सिल्लुतुर्रे (रा. सातारा) व बॉन व्ह्यू बंगलोचे योगेश गो.शिंदे (रा. महाबळेश्‍वर) यांच्यावर महाबळेश्‍वर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलिस उपनिरीक्षक अशोक काशीद व पो.ना. श्रीकांत कांबळे करीत आहेत. महाबळेश्‍वर हे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र असून येथे कोणत्याही प्रकारच्या उत्खननावर बंदी आहे. त्यामुळे बोअरवेलला परवानगी मिळत नाही, असे असतानाही अनेकजण शासकीय यंत्रणा हाताशी धरून, तर कधी बेकायदेशीरपणे बोअरखुदाई करतानाची अनेक प्रकरणे याआधी देखील उघडकीस अली आहेत. याबाबत युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना कडे तक्रार केली होती. तहसीलदार रमेश शेंडगे यांनी तातडीने कारवाई करीत बोअरवेल जप्त केली.