जागतीक योग दिनानिमीत्त शिक्षकांसोबत विद्यार्थी वर्गानेही योग साधनेचे धडे गिरवत निरोगी राहण्याची प्रतिन्या केली


म्हसवड :जागतीक योग दिनानिमीत्त देवापुर ता.माण येथिल जि. प. शाळेत सर्व शिक्षकांसोबत विद्यार्थी वर्गानेही योग साधनेचे धडे गिरवत निरोगी राहण्याची प्रतिन्या केली. 

यानिमीत्ताने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात प. समिती माणच्या शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड या विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्व सांगताना म्हणाल्या की या धावपळीच्या जगण्यात निरोगी आयुष्य जगण्यासाठी महत्त्वाचा घटक म्हणजे योगासनं आणि प्राणायाम होय, जे आपल्याला दैनंदिन कामे पार पाडण्यासाठी ऑक्सिजन पुरवितात आणि आपला उत्साह वाढवितात. दिवसातला थोडासा वेळ आपण आपल्या शरीरासाठी दिला, तरी दिवसभर ताजेतवाने राहण्यास आपल्याला मदत मिळते.

योगसाधना हा भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. शरीर व मनाच्या आरोग्यासाठी योगसाधना औषधासारखे काम करते. नियमित योगसाधनेमुळे रोगप्रतिकार शक्तीत वाढ होऊन आरोग्यसंपन्नता येते. अनेक गंभीर आजारात सहायक उपचारपद्‌धती म्हणून योगाभ्यासाचे महत्त्व अनेक नामवंत तज्ज्ञ डॉक्टरही मान्य करीत आहेत.आरोग्य हीच खरी संपत्ती' असेही त्या शेवटी म्हणाल्या. यावेळी उपस्थीत शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी गायकवाड यांच्यासोबत योगाचे काही प्रात्याक्षीके केली. 

यावेळी २१ जून या योग दिनानिमित्त निर्भीड फौंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. शाळेचे सहकारी शिक्षक, शेंडे सर, नरळे सर, व फाटे मॅडम यांनी मान्यवरांच स्वागत केले व मुख्याध्यापक हत्तीकर यांनी आभार मानले.

No comments

Powered by Blogger.