Your Own Digital Platform

गुणवरे च्या सौ. साधना गावडे समाजभूषण पुरस्कारा'ने सन्मानित


राजुरी : गुणवरे ता. फलटण येथील ईश्वर कृपा शिक्षण संस्थेच्या सचिव सौ. साधना संभाजी गावडे यांना नुकताच 'धनगर माझा' सन्मान सोहळ्याप्रसंगी शनिवार वाडा पुणे येथे समाजभूषण पुरस्कारानेसन्मानित करण्यात आले आहे. यावेळी जेष्ठ आमदार गणपतराव देशमुख, आ. रामहरी रूपनवर, आ. रामराव वडकुते, धनगर माझा चे संपादक धनंजय तानले , मा. आ. पोपटराव गावडे व आर. टी. ओ. अधिकारी संभाजी गावडे आदींसह मान्यवर मंडळी उपस्थित होती. सौ. साधना गावडे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.