साताऱ्यात वकिलाच्या घरावर दगडफेक


सातारा : कृष्णानगर, सातारा येथे ॲडव्होकेट> विकास पाटील - शिरगावकर यांच्या घरावर शुक्रवारी दुपारी अज्ञातांनी दगडफेक केली आहे. सुदैवाने या घटनेट कोणी जखमी झाले नसून, कुटुंबीय मात्र भयभीत झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.याबाबत अधिक माहिती अशी, ॲडव्होकेट विकास पाटील- शिरगावकर हे कुटुंबियांसोबत कृष्णानगर येथे वास्तव्यास आहेत. शुक्रवारी दुपारी ते जिल्हा कोर्टात होते तर पत्नी मुले घरी होते. 

दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चार ते पाच जणांचे एक टोळक्‍याने घरावर दगडफेक केली. या घटनेत घराच्या काचा फुटल्याने कुटुंबीयांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. मदतीसाठी घरातल्‍या सदस्‍यांनी आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. या घटनेनंतर या परिसरात खळबळ उडाली. तत्काळ शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, ॲडव्होकेट विकास पाटील- शिरगावकर हे सातारा जिल्हा न्यायालयातील तत्कालीन जिल्हा सरकारी वकील असून, अनेक केसेसमध्ये त्यांची शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त केली आहे.

No comments

Powered by Blogger.