अभिजितच्या पाठीवर सत्यजितदादांची कौतुकाची थाप


पाटण : घरची परिस्थिती अत्यंत गरीब, वडील, भाऊ बहिण अंध, दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करणारी आई, केरसुणी तयार करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या चोपडी येथील चव्हाण कुटुंब, अभिजितच्या शिक्षणासाठी वडिलांना दुभती म्हैस विकावी लागली, तर दहावीचा परीक्षा फॉर्म भरण्यासाठी आईने कानातील सोन्याची फुले गहाण ठेवली. होतकरू व हूशार अभिजीतनेही आपल्या गरीबीची जाणीव ठेवून जिद्दीने अभ्यास करून दहावीच्या परिक्षेत ९३% मिळवले. आज आई-वडिलांच्या त्यागाचे चिज झाले होते त्यांच्या डोळ्यात आंनद अश्रु वाहत होते पण त्याच बरोबर आपल्या हुशार लेकाच्या पुढील शिक्षणाची काळजीही जाणवत होती. 

अभिजितला आय.ए.एस. ऑफिसर व्हायचे आहे. हि गोष्ट पाटण तालुक्याचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांना समजल्यावर दादांनी अभिजीतच्या पुढील शिक्षणासाठी लागेल ती मदत करण्याचे वचन दिले. आज सत्यजीतदादांनी अभिजीतला भेटून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली व त्याचे अभिनंदन केले. त्याचबरोबर त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सत्यजितदादांनी आज पुन्हां एकदा आपली सामाजिक जबाबदारी जोपासली.

No comments

Powered by Blogger.