Your Own Digital Platform

निंबळक येथे कृषी कन्यांचे स्वागत


राजुरी : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषी कन्या निंबळक गावात दाखल झाल्या आसुन निंबळक ग्रामपंचायत च्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सरपंच सौ. संगीता निंबाळकर तंटामुक्ती अध्यक्ष जयराम मोरे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष विलास बनकर उपाध्यक्ष दत्तात्रय जगदाळे व ग्रामपंचायत सदस्य आदींनी कृषी कन्यांचे स्वागत केले.

कृषी कन्या पुढील २० आठवडे निंबळक व परिसरात सामाजिक विकासाचे विविध उपक्रम राबवणार आसुन त्यामध्ये गटचर्चा , प्रात्यक्षिके , चर्चासत्रे, शेतीविषयक व्याख्याने, जनावरांचे लसीकरण, माती परीक्षण, वृक्षारोपण आदी उपक्रम घेणार आहेत. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. शिंदे प्रा. एस. एस. अडत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे कृषी कन्या मध्ये कु.अंकिता शिवथरे कु.श्यामल अभंग, कु. प्राजक्ता भोईटे कु. मोनिका शिंदे कु.प्रिया इनामके , कु.ऐश्वर्या देशमुख कु. सुनिता ठोंबरे आदींच सहभाग आहे.

यावेळी कृषी कन्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे अश्वासन सरपंच सौ संगीता निंबाळकर यांनी दिले.ऐश्वर्या देशमुख यांनी प्रास्ताविक सुनीता ठोंबरे यांनी आभार मानले. अंकिता शिवथरे यांनी कृषी कन्यांची ओळख करून दिली.