Your Own Digital Platform

तांबवे शाळेचा दहावीचा निकाल ९०.२४ %


आरडगांव : तांबवे ता. फलटण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमानशेठ गणपतराव सुर्यवंशी विद्यालयाचा निकाल ९०.२४ % टक्के लागला असुन विद्यालयाने दहावीच्या ऊज्जल निकालाची परंपरा कायम ठेवली असून  विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक शुभम विजय शिंदे या विद्यार्थ्यांने ९०.२०% गुण मिळवून तर विद्यालयामध्ये व्दीतीय क्रमाक सेजल संजय निंबाळकर या विद्यार्थिनीने ८९.४० % गुण मिळवून  तर तृतीय क्रमांक प्रतिक राजेंद्र शिंदे या विद्यार्थ्यांने ८५.२० % गुण मिळवून मिळवला आहे.

विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविलेल्या तिनही विद्यार्थांचे व. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. रिटेसर, शाळा स्कूल कमिटीचे अध्यक्ष, मा. श्री.लालासाहेब शिदे, मा. श्री. रमेश ( अण्णा ] शिंदे, मा. श्री. रविंद्र शिंदे, ऊपसरपंच विशाल भाऊ शिंदे , माजी सरपंच अर्जुन शिंदे, मा. श्री. राजेंद्र शिंदे, ह.भ.प प्रदीप महाराज नलवडे, प्रा. शशिकांत शिंदे, प्रा. अरविंद जगताप आदी मान्यवरांनी केले आहे.