दादासाहेब कांबळे वाळु माफियांचे " कर्तनकाळ "


म्हसवड : शेतकऱ्यांना शेतातील मातीमिश्रीत वाळुचे निष्कासन करण्यासाठी माण-खटाव तालुक्यात दिलेले परवाने सबंधित शेतकऱ्यांनी आदेशात दिलेल्या अटी व शर्तींना मुटमाती दिल्याचा अवहाल प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांना दताच तात्काळ अपरजिल्हाधिकारी यांनी तत्काळ माण-खटाव मधील ८ परवाने रद्द केले असुन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयाने ते वाळु माफियांचे " कर्तनकाळ " ठरले आहेत तर ज्यादा खोदाई केलेल्या शेतकऱ्यांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

नदीलगत असलेली शेतजमीनीतील वाळुचे निष्कासन करून ती जमीन शेतीयोग्य होण्याच्या हेतुने माण मध्ये म्हसवड तर खटाव मध्ये खातगुण , अंबवडे , विखळे या ठिकाणी ८ शेतकऱ्यांना परवाने दिले होते , प्रतिब्रास ४०० /- ( रूपये ) प्रमाणे शेतकऱ्यांनी रक्कम महसुल विभागाकडे भरली होती मात्र उत्खननास कब्जा दिल्या पासुन आदेशात दिलेल्या अटी व शर्ती पायदळी तुडवल्याच्या अनेक तक्रारी झाल्या होत्या तर खुद्द एका परवाना घेतलेल्या म्हसवड येथील शेतकऱ्यांने ज्या वाळु माफियाला वाळु विकली होती त्याच्या विरूद्ध लेखी तक्रार दिली होती ,उलट शेतकऱ्यांनाच हत्यारबंद गुंडानी दमबाजी केली होती.


या सर्व बाबींची गंभीर दखल घेऊन कर्तव्यनिष्ठ प्रांताधिकारी म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब कांबळे यांनी गुरूवार दिनांक २१ रोजी कब्जा दिलेल्या सर्वेनंबर ऐवजी दुसऱ्यां ठिकाणाहुन उत्खनन करणे , माणगंगा नदीपात्रातुन वाळु उपसा करणे , सायंकाळी ६ वाजलेनंतरही रात्री-अपरात्री वाळुचे उत्खनन करून अवैध वाहतुक करणे , मातीमिश्रीत वाळु वाहतुकीसाठी परवान्यापेक्षा जास्त वाहने वापरने ,उत्खननाच्या ठिकाणी तहसीलदार माण यांनी प्रामाणित करून दिलेल्या नोंदवहिवर तलाठी व मंडलाधिकारी यांच्या कडुन तपासून न घेणे, दिलेल्या परिमाणापेक्षा जास्त उत्खनन करणे , तहसीलदार यांनी भेट दिली असता तपासणी रजिस्टर न देणे ,निष्कासित वाळुचे व्यापारीकरण करणे आदि अटी व शर्तींचा भंग केल्याचा टपका ठेऊन म्हसवड येथील गणपती बाबु कलढोणे , धनंजय ज्ञानदेव विरकर व शिवाजी वस्दाद बनकर , गणपतराव आबासो राजेमाने , महादेव वामन माने तर खटाव मधील प्रमोद व्दारकानाथ कारखानीस ( खातगुण ) , जगन्नाथ चांगदेव बुधे (अंबवडे ), रामचंद्र गोविंद घार्गे ( विखळे ) , अनुसया सदाशिव शिंदे ( विखळे ) हे ८ परवाने रद्द करण्याचा अवहाल जिल्हाधिकारी यांना दिल्या नंतर अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी तत्काळ गुरूवारी सर्व परवाने रद्द करण्याचा आदेश काढला आहे.

यामधील बहुतांशी शेतकऱ्यांनी वाळु माफियांना थोडेफार पैसे घेऊन उत्खनन करण्यासाठी दिले होते मात्र या वाळु माफियांनी नियमावली धाब्यावर बसवुन सर्रास मोठ्या प्रमाणात वाळु उपसा केला होता तर काहींनी नदीपात्रातुन वाळु उपसा केला होता , प्रत्येक परवाना धारकांना ४ -६ आदेशानुसार तेवढ्या वाहनांनाच वाळु वाहतुक करण्याची परवानगी होती मात्र प्रत्येक ठिकाणी शेकडो ट्रक व डंपरच्या साहाय्याने वाळु वाहतुक केली जात होती , त्यामुळे अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या व ते परवाने रद्द करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती त्या अनुषंगाने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तसा परवाना रद्द करण्याबाबत अवहाल सादर केला आणि तत्काळ अप्पर जिल्हाधिकारी यांनी ते परवाने रद्द केले , त्यामुळे वाळु तस्करांची मुजोरी महसुल विभागाने मोडीत काढली असुन वाळु तस्करांचे कंबरडे मोडले आहे.

बळीराजा जागा हो !


सदर परवाने शेतकऱ्यांना शेतजमीन कसण्यासाठी उपयुक्त होण्यासाठी मातीमिश्रीत वाळुचे निष्कासन करण्यासाठी दिले आहेत , याची सर्व जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांची आहे मात्र शेतकऱ्यांना फुस लावुन वाळु माफियांनी स्वतः शेतकऱ्यांच्या नावे शासनाची रक्कम भरून वाळु उपसा केला आहे , मात्र यामधील शर्ती व अटींचा भंग झाल्यास शेतकऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे व अन्य ठिकाणी उत्खनन केल्यास महाराष्ट्र महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७)(८) तसेच गौणखनिज उत्खनन काढणे नियम १९६८ व महाराष्ट्र जमिन महसुल नियम २०१७ मधील नियम ९ अनन्वये , महाराष्ट्र रेव्हीन्यु ज्युरिडक्शन अॅक्ट १८७६ मधील कलम ३ ,५ व ११ अन्वये कारवाई बरोबर फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात , त्यामुळे ह्या मध्ये बळीराजा वर कारवाई होऊ शकते त्यामुळे बळीराजाने विचार करण्याची गरज असुन सध्या अनेक प्रस्ताव परवान्यासाठी दाखल झाले असुन शेतकऱ्यांनी जागे होण्याची गरज आहे.


काही शेतकरी तोट्यात !म्हसवड मधील दोन शेतकऱ्यांना काही दिवसांपूर्वीच परवाना मिळाला होता तर काहीच्या शेतातुन वाळु न निघाल्याने तर उत्खनन करण्यास पुरेसा वेळ न देता वेळेपुर्वीच परवाने रद्द केल्याने त्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका मोठा बसण्याबरोबर शेतातील वाळुमिश्रीत मातीचे निष्कासन पुर्ण झाले नाही त्यामुळे ते शेतकरी तोट्यात गेले असुन त्यांना अजुन काही दिवस वेळ वाढवुन देण्याची गरज असल्याचे संबधीत शेतकरी वर्गातुन बोलले जात आहे.

No comments

Powered by Blogger.