Your Own Digital Platform

वडले बसथांब्यावर विद्युत वाहकतारा धोकादायक


जावली : वडले ता फलटण येथील जुन्या बसथांब्या जवळ विजेच्या तारा रस्त्याजवळच तुटलेल्या अवस्थेत लोंबकळत आहेत यामधील विद्युत पुरवठा बंद केलेला आहे मात्र गेल्या १५ दिवसांपासून या तुटलेल्या तारा जोडण्यात आलेल्या नाहीत या तारांवरूनच मुख्य मेन लाईन च्या विजवाहक तारा गेलेल्या आहेत या तुटलेल्या तारा विज वितरण कंपनीने तातडीने जोडण्याची मागणी वडले तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नानासाहेब सोनवलकर यांनी केली आहे .