Your Own Digital Platform

जगाचा कानोसा घेऊन ध्येय निश्‍चित केल्यास करिअर यशस्वी : प्रा. कुलकर्णी


सातारा: आर्टस, कॉमर्स, सायन्स या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना बारावीनंतर उच्च शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधींची योग्य निवड करणे हे विद्यार्थ्यांपुढे आव्हान आहे. जगात नवीन काय चालले आहे, कोणत्या दिशेने जग पुढे जात आहे, हे ओळखून विद्यार्थ्यांनी ध्येय निश्‍चित केल्यास चांगले करिअर घडेल, असा विश्‍वास संजय घोडावत इन्स्टिट्युटचे प्रा.व्ही.व्ही. कुलकर्णी यांनी व्यक्त केला.संजय घोडावत युनिर्व्हसिटी प्रेझेंट ‘पुढारी एज्यु दिशा 2018’ पॉवर्ड बाय पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ, पुणे, असोसिएट स्पॉन्सर्स विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट पुणे. को-स्पॉन्सर्स चाटे ग्रुप शिक्षण समूह, मराठवाडा मित्र मंडळ, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित ‘पुढारी एज्यु दिशा 2018’ प्रदर्शनात ‘उच्च शिक्षणातील संधी आणि आव्हाने’ याविषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

प्रा. व्ही. व्ही. कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची अनेक दालने खुली झाली आहेत. मेडिकल, इंजिनिअरिंग, व्हर्च्युअल रिलिटी, सायन्सच्या विविध शाखा, संशोधन , अर्किटेक्‍चर, इंडियन आर्मी, मेडिकल, फार्मसी, बेसीक सायन्स, रिसर्च अशा अनेक क्षेत्रात करिअरच्या नवीन संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. करिअर अनेक आहेत. विद्यार्थ्यांनी स्वत:ला सिध्द करता येईल अशा योग्य करिअरची निवड करा व पूर्वीपेक्षा सध्या उच्च शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना चॉईस वाढला आहे. अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. सायन्समध्ये बेसिक सायन्स, मेडिकल, फुड प्रोसेसिंग, रिसर्चला खूप स्कोप आहे. संशोधन क्षेत्रातही अनेक संधी विद्यार्थ्यांसाठी आहेत.

प्रा.व्ही.व्ही. कुलकर्णी म्हणाले, इंजिनिअरींग शिक्षणाची इंडस्ट्रीज क्षेत्राशी सांगड घालून औद्योगिक क्षेत्रामध्ये आवश्यक असे शिक्षण दिले जात आहे.त्यामुळे इंडस्ट्रीजला आवश्यक असे प्रशिक्षण या विद्यार्थ्यांना दिले जाते. इंजिनिअरींगमध्ये सिव्हिल इंजिनिअरींग ही प्रचंड पैसा असलेली बॅच आहे. आगामी कालावधीत याक्षेत्रात मोठे काम होणार आहे. त्यामुळे संधी अनेक आहेत. लाईफ लाँग चालणारी ही बॅच आहे. मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, एअरोनॉटिक्समध्येही करिअरची मोठी संधी आहेत. कॉमर्स, लिब्ररल आर्टस् यामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत.विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. कुलकर्णी यांनी केले आहे.