Your Own Digital Platform

तिच्या जिद्दीसमोर अखेर यशानेही लोटांगण घातलेम्हसवड : कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी हवी असते चिकाटी व जिद्द या दोन्हींच्या जोरावर प्रत्येक व्यक्ती आपले इच्छित ध्येय साध्य करु शकते यासाठी त्या व्यक्तीचे वय ही त्याला आडवु शकत नाही प्रामाणीक प्रयत्नाला चिकाटी आणि आत्मविश्वासाची जोड मिळाल्यास कोणतीही गोष्ट अवघड नाही हे दाखवुन देण्याची किमया माणच्या रणरागिणीने दाखवुन दिली असुन महिलांनी जर ठरवले तर तीच्यासाठी काहीही अशक्य नाही मग ते क्षेत्र कोणतेही असो यश हे मिळतेच यशस्वी होण्यासाठी प्रयत्न महत्वाचे असल्याचे पुन्हा एकदा माणच्या स्वाती माळवे या महिलेने दाखवुन दिले असुन त्यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी आपल्या मुलीसोबत इयत्ता १० वी ची परिक्षा देवुन त्या परिक्षेत घवघवीत यश मिळवले असल्याने सध्या माण तालुक्यात स्वाती माळवे व त्यांची मुलगी रागिणी माळवे या माय लेंकींचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. स्वाती माळवे यांच्या जिद्दी मुळे अखेर यशानेही लोटांगण घातल्याचे बोलले जात आहे.

पळशी , ता-माण येथील स्वाती माळवे यांनी जिद्दीच्या जोरावर आपल्या रागिणी माळवे या मुलीसोबत दहावीच्या परिक्षा उत्तीर्ण झाल्या असुन स्वाती या पळशीतील लक्ष्मण ढोले या निवृत्ती शिक्षक यांच्या कन्या त्यांचा विवाह इयत्ता दहावी मध्ये असताना पळशीतीलच सोने-चांदीचे प्रसिद्ध व्यापारी राम माळवे यांच्याशी २००० साली झाला त्यावेळी त्यांना इंग्रजी व गणीत हे दोन पेपर देता आले नाहीत त्यामुळे त्या दहावीत अनुत्तीर्ण झाल्या मात्र त्यांना काहीही करून दहावी पास व्हायच हि खंत स्वस्थ बसुन देत नव्हती अशातच त्यांची मोठी मुलगी रागिणी ही दहिवडी येथील परशुराम शिंदे कन्या विद्यालयात दहावीत शिकत होती , त्यावेळी त्यांनी आपल्या मुलीसोबत अभ्यास करून दहावीची परीक्षा उत्तीर्ण होण्याची मनाशी जिद्द बांधली आणि फाॅर्म भरून त्या घरीच अभ्यास करू लागल्या , रागिणीची पुस्तके व नोटस त्यांनी वाचल्या , त्यांनी पहिली परिक्षा देऊन तब्बल १८ वर्षे झाली असुनही तेव्हांच्या अभ्यासक्रमात आणि आताच्या अभ्यासक्रमात मोठा बदल असुनही त्यांनी जिद्दीने अभ्यास करून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत , या सर्व यशामध्ये त्यांचे पती राम माळवे यांनी त्यांना प्रेरणा दिली , स्वाती यांनी आता या पुढे पदवीधर होण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगल आहे , त्यामुळे या माय-लेंकीच सर्वत्र कौतुक केल जात आहे.


स्वाती या २००० साली दहावीची परिक्षा अनुत्तीर्ण झाल्या होत्या तेव्हा पासुन तब्बल १८ वर्षे त्यांनी साध पुस्तकाच पानही पलटल नव्हत मात्र त्यांनी मुलगी रागिणीची पुस्तके वाचली व त्यांचा रागिणीने घरी अभ्यास घेतला असला तरी रागिणीला ८७ . ८०टक्के एवढी भरघोस मार्कस मिळाली आहेत तर गणितात स्वाती यांना ८० तर रागिणीला ८७ टक्के इतके मार्कस मिळाले असुन रागिणीची जिद्दही समोर आली आहे .शिक्षणासाठी वय कधीच आडवे येत नाही फक्त त्यासाठी तुमची शिकण्याची प्रामाणीक ईच्छा तुमच्यासोबत पाहिजे, प्रामाणीक पणे प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते, यापुढे महिलांनी स्व:ला फक्त घरकामात गुंतवुन न घेता शिक्षण घेवुन स्वत:ला स्वयंपुर्ण बनवावे.

-स्वाती माळवे
- पळशी