सचिन पवार यांची फलटण बाजार समितीच्या आरोग्य कमिटी मध्ये निवड


राजुरी : राजुरी ता. फलटण येथील सोसायटीचे मा. चेअरमन व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक सचिन आबासाहेब पवार यांची फलटण बाजार समितीच्या आरोग्य कमिटी मध्ये निवड करण्यात आली आहे. 

सचिन पवार यांनी राजुरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन पद सलग 11 वर्षे भूषवले आहे. त्यामुळे त्यांना सहकार क्षेत्रातील अनुभव आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे त्यांच्या वरती विशेष प्रेम असल्याने त्यांची निवड करण्यात आली आहे. 

सचिन पवार यांच्या निवडीबद्दल भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन व राजुरी गावचे मा. सरपंच डाॅ. बाळासाहेब सांगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते योगीराज साळुंखे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक मधुकर माळवे, राजुरी गावचे उपसरपंच पै. भारत गावडे, सदस्य विठ्ठल खुरंगे, राजुरी सोसायटीचे चेअरमन महादेव गावडे, व्हा. चेअरमन संभाजी पवार, युवा उद्योजक विनोद सांगळे , संकल्प फाऊंडेशनच्या पदाधिकारयांनी अभिनंदन केले आहे. 

आपण आपल्या पदाचा उपयोग आपल्या परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी करणार असून गोरगरिबांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपण काम करणार असल्याचे सचिन पवार यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.