महावितरणच्या वतीने फिरते वीज बिल भरणा केंद्र सुरू व पालखी मार्ग पाहणी


राजुरी : सातारा मंडळ येथे नव्याने रुजू झालेल्या अधिक्षक अभियंता सौ. पुनम रोकडे यांनी पदाची सूत्रे हाती घेताच कामाचा धडाका लावला आहे. संत शिरोमणी श्री. ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा मुक्कामी असणाऱ्या लोणंद , तरडगाव, फलटण व बरड येथील पालखी तळांची पाहणी केल्यानंतर विद्युत वाहिन्यांची देखभाल दुरूस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे सांगून पालखी सोहळा कालावधीमध्ये अखंडित वीज पुरवठा ठेवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी कर्मचारी यांना दिल्या.फलटण विभागास भेट देवून कामाचा आढावा घेण्यात आला.

सौ. पुनम रोकडे यांचे शुभहस्ते व बरड गावच्या सरपंच सौ. तृप्ती गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण विभागातील फिरते वीज भरणा केंद्र व्हनचे उदघाटन करण्यात आले. ग्राहकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व वीज बिल वेळेत भरून महावितरण कंपनीस सहकार्य करावे असे आवाहन अधिक्षक अभियंता यांनी केले.

ग्राहकाभिमुख सेवा देणेसाठी घरोघरी जाऊन वीज बिल भरणा करून जागेवर पावती देण्यात येणार आहे.यापुढे ग्राहकांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच पालखी मार्गावरील विद्युत वाहिनी देखभाल दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर चालू असून पालखी कालावधी मध्ये अखंडित वीज पुरवठा चालु राहील असे अश्वासन कार्यकारी अभियंता राजदीप यांनी दिले.

यावेळी फलटण ग्रामीणचे उपकार्यकारी अभियंता सूर्यवंशी बरड सब डिव्हिजन चे सहाय्यक अभियंता प्रमोद सोनवणे, निंबळकचे वेदपाठक तसेच कर्मचारी वर्ग व ग्राहक उपस्थित होते.


पहिल्या महिला अधिक्षक अभियंत्या - सौ. पुनम रोकडे
सातारा जिल्हा महावितरण च्या मंडलच्या अधिक्षक अभियंता पदी पहिल्या महिला अधिकारी म्हणून सौ. पूनम रोकडे रूजू झाल्या आहेत. त्यांनी सातारा जिल्ह्यातील पालखी तळाची पाहणी करून पालखी सोहळा काळात अखंड वीज पुरवठा पुरवला जाईल अशी ग्वाही दिली.

No comments

Powered by Blogger.