सातारा-कास रस्त्यावरील यावतेश्वर घाटात रस्ता खचला


सातारा : गेल्या काही दिवसांपासून सातारा शहर आणि परिसरात पावसाने जोर धरला आहे. यावतेश्वर परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळेच सातारा-कास रस्त्यावरील यावतेश्वर घाटात गुरुवारी सकाळी रस्ता खचला. त्यामुळे येथून वाहने चालवणे धोकादायक बनले आहे.जून महिना सपल्यानंतर शहर आणि परिसरात काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे परळी खोऱ्यात असणाऱ्या सज्जनगड रस्त्यावर दरड कोसळली होती, तर आज यावतेश्वर घाटात रस्ता खचला आहे. 

यापूर्वी याच घाटात रस्ता खचला होता. त्यामुळे नागरिकांना फार त्रास सहन करावा लागला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम पूर्ण केले होते. त्यानंतर या पावसाळ्यातही घाटातील रस्ता खचल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू होणार आहे. यासाठी पर्यटक मोठया प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे खचलेल्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.

No comments

Powered by Blogger.