ट्रान्सफार्मर बदलून न दिल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ


फलटण : मुंजवडी ता.फलटण येथील घुलेवस्ती ट्रान्सफार्मर गेली एक महिना बंद असल्याची तक्रार दाखल करुनही व वीज बिले भरूनही महावितरण विभागीय कार्यालय कार्यकारी अभियंता राजदीप अधिकारी यांनी ट्रान्सफार्मर बदलून दिला नाही यामुळे शेतकऱ्यांनी फलटण महावितरण विभागीय कार्यालयात शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता राजदीप यांना पेट्रोल व काडेपेटी देऊन विजे अभावी आमची पिके जळत आहेत ती आम्हाला पाहवत नाही त्यापेक्षा पेट्रोल पाजून अथवा पेटवून आम्हाला काय करायचे ते करा अशी संताप जनक मागणी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शाखा अभियंता सोनवणे यांनी ट्रान्सफार्मर बसवण्यासाठी प्रत्येकी 1200 रुपये घेतले तसेच शेतकऱ्यांनी थकीत वीजबिल भरूनही ट्रान्सफार्मर बसवला नसल्याने 125 एकरामधील ऊस, भाजीपाला, फुलशेती जळाले असून वीज नसल्याने पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध नसून पिक ही जळाली आता प्यायला पाणी नाही आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. वीज पुरवठा पूर्वरत करता येत नसेल तर किमान आम्हाला पेट्रोल पाजून अथवा पेटवून देऊन मारून टाका अशी मागणी शेतकऱ्यांनी करत पेट्रोल व काडेपेटी महावितरण विभागीय कार्यालय कार्यकारी अभियंता राजदीप यांच्या टेबलावर ठेवल्याने कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ट्रान्सफार्मर बंद असल्याने शेती पंपास वीज नसतानाही रीडिंग असलेली वीज बिले येत आहेत. वापर नसताना हजारो रुपयांची बिले खोटी रीडिंग टाकून येत आहेत, नवीन ट्रान्सफार्मरच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे ट्रान्सफार्मर बसवण्यात येत असून दोन ते तीन दिवसात ट्रान्सफॉर्मर पुन्हा जळत आहेत, ग्रामीण भागात महावितरणचे कर्मचारी व अधिकारी फिरकत नाहीत, प्रचंड वीज चोरी सुरू आहे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे अशा विविध तक्रारी घेऊन मुजवंडी येथील 25 ते 30 शेतकऱ्यांनी गेली एक महिने जळालेला ट्रान्सफॉर्मर जोडून मिळावा यासाठी फलटण महावितरण विभागीय कार्यालय कार्यकारी अभियंता राजदिप यांची भेट घेतली.

गेली एक महिने वीज पुरवठा बंद असल्याने तसेच पावसाने हुलकावणी दिल्याने 125 एकरातील पिके जळाली असल्याने तसेच विजेअभावी पिण्यास पाणीही उपलब्ध होत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता राजदिप यांची भेट घेतली. ट्रान्सफॉर्मर तत्काळ जोडण्याचे व चुकीची वीज बिले दुरुस्ती करण्याचे तसेच अनधिकृतपणे शेतकऱ्यांकडून पैसे घेणाऱ्या शाखा अभियंता सोनवणे यांच्यावर 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी केली. यावेळी कारवाई करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता राजदिप यांनी दिले. पुढील तीन दिवसांत ट्रान्सफार्मर न बसवल्यास आंदोलनाचा मार्ग निवडावा लागेल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

No comments

Powered by Blogger.