दहिवडी येथे १५ जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन


सातारा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा व रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दहिवडी महाविद्यालय दहिवडी येथे १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक संचालक सचिन जाधव यांनी दिली आहे.

हा रोजगार मेळावा एसएससी, एचएससी, सीएनसी, व्हीएमसी, आयटीआय फिटर/ग्राइंडर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, टर्नर, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, शिट मेटल वर्कर, वेल्डर, प्लॅस्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, वायरमॅन, डिप्लोमा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ॲटोमोबाईल, बी.ई इलेक्ट्रिकल, मेटॅलॉर्जी, प्रोडक्शन मॅकेनिकल, बी.टेक (फूड), एम.बी.ए., पदवीधर, पदव्युत्तर पदवी पास उमेदवारांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये सातारा जिल्ह्यातील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. मेळाव्यात उमेदवारांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.

त्यासाठी या विभागाच्या www.mahaswayam.in या वेबसाईटवर किंवा mahaswayam या मोबाईल ॲपवर नोंदणी करुन या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवणे गरजेचे आहे. ज्यांची नोंदणी नाही असेही उमेदवार मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. या उमेदवारांनी रोजगार मेळाव्यास येताना बायोडेटाच्या तीन प्रती व फोटो सोबत आणावेत. तरी या मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. जाधव यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.