निंबळक येथे कृषी दिन साजरा


राजुरी : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांनी निंबळक ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा येथे वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून कृषी दिंडी काढण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय येथे सेंद्रिय शेती व त्यांचे फायदे या विषयी संदीप कोठूले व नवनाथ जगताप यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी निंबळक गावच्या सरपंच सौ. संगीता निंबाळकर, उपसरपंच रवींद्र भोसले, गावचे पोलीस पाटील समाधान कळसकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जयराम मोरे, बरड चे कृषी पर्यवेक्षक एल. डी. शिंदे, कृषी सहायक एच. आर. अभंग, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक एल. डी. जंगम, प्राध्यापक एस. एस. आडत , जी. एस. शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सुञसंचालन अंकिता शिवथरे यांनी केले. आभार शामल अभंग यांनी मानले. यावेळी ऐश्वर्या देशमुख, सुजाता ठोंबरे, प्राजक्ता भोईटे, मोनिका शिंदे, प्रिया इनामके या कृषी कन्या उपस्थित होत्या.

No comments

Powered by Blogger.