Your Own Digital Platform

पुतळा दहन प्रकरणी ६ जण पोलीसांच्या ताब्यात


म्हसवड : दुध दरवाडीच्या विरोधात स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचे पडसाद माण तालुक्यात उमटले असुन येथिल धामणी गावात दि. १६ रोजी काही तरुणांनी एकत्र येत ना. महादेव जानकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते याप्रकरणी म्हसवड पोलीसांनी धामणी येथिल ६ तरुणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे. 

याविषयी म्हसवड पोलीसांनी दिलेली अधिक माहिती पुढीलप्रमाणे राज्यात दुध दरवाडीच्या संदर्भात दि. १५ जुलै पासुन ठिकठिकाणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलने सुरु आहेत, या पाश्वभुमीवर जिल्ह्यात जमावबंदी करण्यात आली असुन हि. १६ रोजी यानिमीत्त म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीत कोणताही अनुसुचीत प्रकार घडु नये यासाठी पेट्रोलिंग सुरु होते यादरम्यान पळशी गावच्या हद्दीतील वाघजाई धाब्यासमोर धामणी काही तरुण बेकायदेशीर जमाव जमवुन सातारा - पंढरपुर हा राज्य महामार्ग रोखुन रस्त्यावर दुध ओतुन आंदोलन करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यावर तात्काळ याठिकाणी पोलीस पोहचले असता त्याठिकाणी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुधाचा अभिषेक त्या पुतळ्याचे दहन करीत असल्याने पोलीसांच्या निदर्षनास आल्यावर पोलीसांनी त्यांना अटकाव केला यावेळी झालेल्या धापळीत धामणी गावातील अजित भिमराव खाडे, निलेश संजय खाडे, बापु आबा खाडे, तुषार हणमंत खाडे, सुधाकर शहाजी नाकाडे, व विजय उत्तम खाडे या ६ जणांना ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले असुन त्यांच्यावर विविध कलमाने म्हसवड पोलीसांनी गुन्हा दाखल केला असुन याची फिर्याद पो. कॉ. प्रकाश इंदलकर यांनी दिली आहे.