'धडक' सिनेमातील रोमॅन्टिक गाणं 'पहेली बार..'


मुंबई : 'धडक' हा मराठीतील ब्लॉकबस्टर सिनेमा 'सैराट'चा हिंदी रिमेक आहे. त्यामुळे सैराटच्या लोकप्रियतेसोबत या सिनेमाची तुलना होणं स्वाभाविक आहे. 'धडक' चं टायटल सॉन्ग, 'झिंगाट' आणि त्यापाठोपाठ आता 'पहेली बार' हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. 

पहेली बार ..

कोवळ्यावयातील पहिलं प्रेम 'पहेली बार' या गाण्यातून जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. पहिल्या प्रेमाची नशा, त्यामधील वेंधळेपणा या गाण्यात दोघांच्या डोळ्यात पाहण्यासारखा आहे. 

मराठी 'सैराट'मध्ये हे गाणं 'याडं लागलं' होतं. त्यामुळे चाहते या गाण्यासोबत त्याची तुलना करणं स्वाभाविक आहे. पहेली बार... हे गाणं अजय - अतुल यांनी गायलं आहे. तर अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गाणं लिहलं आहे. जान्हवी कपूर 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर शशांक खैतानने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. झी स्टुडिओज आणि अपूर्वा मेहता फिल्म यांच्याद्वारा 'झी स्टुडिओज' या बॅनरखाली 'धडक' सिनेमा सादर केला जाणार आहे.

No comments

Powered by Blogger.