Your Own Digital Platform

शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रचा पुढाकार; दि. २८ रोजी मेळावासातारा : बँक ऑफ महाराष्ट्रच्या जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व निमशहरी शाखांमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शनिवार दि.28 जुलै रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रबंधक हरिशचंद्र माझीरे यांनी दिली आहे.

या शेतकरी मेळाव्यामध्ये बँकेचे अधिकारी, कृषी अधिकारी शेतकऱ्यांना पीक कर्ज आणि इतर कृषी कर्ज योजनांची माहिती देणार असून शेतकऱ्यांकडून कृषी कर्ज मागणी प्रस्तावही या मेळाव्यात स्विकारले जाणार आहेत. तसेच किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे अल्प मुदत पीककर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मेळाव्यात संबंधित शेतकऱ्यांना पीकनिहाय पतपुरवठा केला जाणार असून त्यासोबत 10 टक्के रक्क्म उपभोग आणि कापणी पश्चात खर्च आणि 20 टक्के रक्कम शेतीसामुग्री दुरुस्ती आणि देखभालासाठी दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज नुतनीकरण बाकी आहे. अशा शेतकऱ्यांना नुतनीकरनादरम्यान 10 टक्के पीक कर्ज मर्यादा वाढून दिली जाणार आहे. नव्या शेतकऱ्यांना 5 वर्षासाठी प्रत्येक वर्षी 10 टक्के वाढ गृहीत धरुन पतमर्यादा मंजूर करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत फायदा घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील नवीन पतपुरवठा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दि.28 जुलै रोजी होणाऱ्या शेतकरी मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही माझीरे यांनी केले आहे.