गटशिक्षणाधिकारी यांची शिक्षक संघाला सहकार्य करण्याची ग्वाही


पुसेसावळी : खटाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी शिक्षक संघाच्या शिष्ठमंडळाला दिली आहे.

खटाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या नुतन कार्यकारिणीने शिक्षकांच्या अडीअडचणीसंदर्भात त्यांची भेट घेवून समस्या मांडल्या.तालुक्यात गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे व विस्तार अधिकारी सुजाता जाधव यांच्या चांगल्या कामाबद्दल संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.दरम्यान,वरिष्ठ व निवडश्रेणी प्रस्ताव,सेवापुस्तक अद्ययावत करणे,डिमडेट प्रस्ताव,वस्तीशाळा शिक्षक कायम प्रस्ताव,अपघात विमा,अंशदायी पेन्शन योजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या सर्व समस्यावर लवकरात लवकर सकारात्मक काम करण्याचे पिसे यांनी यावेळी सांगितले.सेवानिवृत्ती निमित्त मंदा गुरव यांचा व नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास कोषाध्यक्ष समिर बागवान,संचालक बंडोबा शिंदे,राज्य संपर्क प्रमुख सुनिल सावंत,पोपट कारंडे,अध्यक्ष सुर्यकांत कदम,प्रविण गोसावी,महिला अध्यक्ष सुषमा फडतरे,मारुती जाधव यांची उपस्थिती होती.प्रारंभी स्वागत सुर्यकांत कदम,प्रास्ताविक गौतम कोकाटे,सुत्रसंचालन शंकर देशमाने यांनी तर आभार शहाजी खाडे यांनी मानले.

फोटो-वडूज येथे गटशिक्षणाधिकाऱ्यांचा सत्कार करताना संघाची नुतन कार्यकारिणी व मान्यवर

No comments

Powered by Blogger.