Your Own Digital Platform

झुणका केंद्राच्या जागेवर अतिक्रमण


म्हसवड : म्हसवड एस. टी. बसस्थानक परिसरात पुर्वी असलेल्या झुणका केंद्राच्या शासनाच्या जागेवर येथिल एका धनदांडग्याने अतिक्रमण करुन त्यावर टोलेजंग इमारतीचे बांधकाम सुरु केले असुन याकडे मात्र पालिका प्रशासनाने गांधारीची भुमीका घेतली असल्याचा आरोप येथील माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र देवबा मासाळ यांनी करीत पालिकेने यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. 

मासाळ यांनी याबाबत पालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की म्हसवडकर नागरीकांची कोणतीही करपट्टी पालिका कोणत्याही परिस्थितीत वसुल करते हे करीत असताना शहरात सुरु असलेल्या नवीन बांधकामाची नोंद आपल्या दप्तरी नोंद करुन ज्या बांधकामाची परवानगी नाही अशांना नोटीस पाठवुन सदरचे बांधकाम पालिकेकडुन बंद केले जात तर ज्यांचे बांधकाम पुर्ण आहे अशा इमारतीचे क्षेत्रफळानुसार दुप्पट, तिप्पट त्यावर कर आकारणी केली जाते हे झाले खाजगी जागेतील बांधकामाबाबत याठिकाणी तर चक्क शासनाच्याच जागेवर अशाप्रकारचे बांधकाम सुरु असुन त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. 
 
वास्तवीक सदर बांधकाम हे एकतर विना परवाना सुरु असुन ते ज्या ठिकाणी सुरु आहे त्याठिकाणी पुर्वी महाराष्ट्र शासनाचे झुणका भाकर केंद्र होते ते बंद झाल्यावर ती शासनाची जागा म्हणुन आजवर रिकामी होती परंतु आता त्या जागेवरच सदरचे बांधकाम सुरु असल्याने पालिकेने याकडे त्वरीत लक्ष देवुन संबधीतांवर कारवाई करावी अशी मागणी मासाळ यांनी केली आहे.