रस्त्यामधील खड्डया मुळेच होतायत अपघात


पाटण  :
मोरगिरी रस्त्यावर नेरळे गावा जवळून जाणाऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून रस्ता खचला आहे त्यामुळे वाहतुकीस अडथळा येऊन हा खड्डाच अपघातास निमंत्रण देत आहे आजपर्यंत छोटी मोठी वाहने त्या खड्ड्यात गेल्यामुळे वाहन धारक व ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.

पाटण तालुक्याला जोडणारा मोरणा विभाग हा मुख्य विभाग आहे विभागाला व्यवसायिक महत्व आले असून या रस्त्यावर दिवस रात्र वाहतूक सुरु असते.यंदाच्या उन्हाळ्यात नेरळे ते माणगाव रस्त्याचे डांबरी करणाचे काम झाले मात्र नेरळे पासून नेरळे फाट्यापर्यंत रस्त्याचे काम राहिले आहे आणि या दरम्यानच खड्डा असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे तो मुजवण्याची मागणी वाहन धारकांच्यातून होत आहे.

No comments

Powered by Blogger.