Your Own Digital Platform

साताऱ्यातील मोबाईल विक्रेत्यांवर गुन्हा


सातारा  : सातारा शहरातील परप्रांतीय मोबाईल विक्रेत्याला मारहाण करण्यात आली .तसेच दुाकानातील मोबाईल घेऊन गेल्या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाईल विक्रेते नरसिराम गेंगाराम चौधरी (मुळ रा. राजस्थान,सध्या रा. राधिका रोड,सातारा) यांनी याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तक्रारदार चौधरी यांचे पंताचा गोट येथे मोबाईलचे साहित्य होलसेल विक्रीचे दुकान आहे. त्यांना सातारा शहरातील निलेश मोरे, आकाश जैन, समीर भाई (पुर्ण नाव नाही) दीपक मोरे यांनी तू किरकोळ विक्री का करतो असे विचारले.

त्यानंतर मारहाण करून दुकानात ठेवलेले दहा मोबाईल ते घेऊन गेल्याची तक्रार सातारा शहर पोलिस चौधरी यांनी ठाण्यात दिली. त्यानंतर गुन्हा दाखल झाला असून त्याचा तपास पोलिस करत आहेत.