Your Own Digital Platform

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे : सुनील बोरकर


वडूज :  सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतीकडे वळावे, असे प्रतिपादन जिल्हा कूषी अधीक्षक सुनील बोरकर यांनी केले.
गोरेगाव वांगी व वडी, ता. खटाव येथील सेंद्रिय शेती व गोशाळा पाहणी प्रसंगी तसेच वृक्षारोपण कार्यक्रम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी औंध मंडल कृषी अधिकारी विजय वसव, आत्मा उपसंचालक राऊत, सरपंच अनिल सुर्यवंशी, रणजित येवले, मोहन मदने, हिंमत माने, संतोष येवले, दादासो येवले, संभाजी कदम, मनोज येवले, संदिप येवले, विजय येवले, नवनाथ महाडिक, वसंत कदम, गणेश येवले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोरकर म्हणाले, आज शेतीमध्ये रासायनिक खते, औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे कॅंन्सरसारखे आजार बळावू लागले आहेत. हे थांबविण्यासाठी सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे देशी गाईंचे गोठे उभारणे गरजेचे आहे. तसेच प्रदूषण मुक्तीसाठी वूक्षलागवड मोठ्या प्रमाणात करावी. त्याद्वारे आपणास फळे, खत व अन्य घटक मिळण्यास मदत होणार आहे.

आधुनिक शेतीसाठी शासनामार्फत जिल्हा स्तरावर प्रशिक्षणाचे वेळोवेळी आयोजन केले जाते. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. वडी येथील फुले भाजी पाला नर्सरीची त्यांनी पाहणी केली. यावेळी विजय वसव यांनी शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती दिली. वडी, गोरेगाव वांगी भागातील शेतकरी उपस्थित होते.