पाटण वनविभागाच्या वतीने कृषी दिनी वनमहोत्सवाचा शुभारंभ


पाटण :  वन विभाग पाटण यांच्या वतीने पाटण तालुक्यात १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने दि.१जुलै ते ३१ जुलै दरम्यान वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या वनमहोत्सवाचा शुभारंभ पाटण वनविभाग व तालुका पत्रकार संघाच्या सहभागाने मौजे घेरादातेगड ता.पाटण येथील वनक्षेत्र रोपवन क्षेत्रात वृक्ष लागवड करून करण्यात आला.

या वेळी पाटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष,पत्रकार, शंकरराव मोहिते, नितीन खैरमोडे, विद्या म्हासुणेॅकर-नारकर,बाबासाहेब सुतार,संजय कांबळे,बाळासाहेब देसाई कॉलेजचे प्रा.सुनिल पानस्कर,(सर),स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विकास हादवे , पाटणचे वनक्षेत्रपाल व्हि.आर.काळे,वनपाल एस.पी. जाधव, वनरक्षक वर्षा चौरे, वनरक्षक लोखंडे,रामदास घावरे,रमेश कदम,सुरेश पवार.व स्थानिक गामस्थ यांनी वृक्ष लागवड करून शुभारंभ केला.

पाटण तालुका वनविभागाच्या वतीने १जुलै ते३१जुलै दरम्यान वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.चालू वर्षी पाटण तालुक्यात एकूण ३लाख६४ हजार २६० रोपांचे लागवडीचे उद्दिष्ट या कालावधीत साध्य करायचे आहे.

कांचन,जांभूळ,आंबा,फणस, आवळा,करंज,खैर,बेहडा, ऐन,शिवण,वडपिंपळ,आपटा, शिसू,बोर,पळस, इत्यादी प्रजातींची लागवड वनविभागाच्या विविध ठिकाणच्या क्षेत्रात करण्यात येत आहे.

पाटण वनविभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या वनमहोत्सवाच्या कालावधीत तालुक्यातील विविध सेवाभावी संस्था,शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी,तरूण मंडळे यांनी सहभागी व्हावे असे आवाहन वनक्षेत्रपाल व्हि.आर.काळे यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.