लोणंद पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात


लोणंद : लोणंद ता. खंडाळा येथील अनेक वेळा अतिक्रमण विरोधी मोहिमा राबूनही लोणंदच्या रस्त्यावरील अतिक्रमणांची परिस्थीती जैसे थे असून अतिक्रमणामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे लोणंदकर हैराण झाले आहेत .

मागीलच महिन्यांत अतिक्रमण करणाऱ्यांना सुचना व कायदेशीर कारवायी करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर सर्वांनी अतिक्रमणे स्वतः हून मागे घेतली होती. मात्र दोन चार दिवसानंतर पराथिती जैसे थे झाली आहे . पुन्हा हातगाडीवाले व फळ विक्रेत्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला असून पुणे सातारा रोडवर त्यामुळे वाहतूकीची प्रचंड कोंडी होत आहे.

काही दिवसावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा लोणंद मुक्कामी येत असल्याने पुढील काही दिवस खरेदी विक्री व वाहतुकही दुपटीने वाढणार असुन या रस्त्यावर चालणेही मुश्किल होणार आहे . तरी संबधीताने याकडे गांभिर्याने लक्ष घालून कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी जनतेमधुन मागणी होत आहे .

No comments

Powered by Blogger.