गुणवंतांचा सत्कार प्रेरणादायी उपक्रम : नंदकुमार भोईटे


जावली : जावली ग्रामस्थांच्या वतीने दहावी बारावी मधील गुणवंतांचा सत्कार हा उपक्रम प्रेरणादायी आहे या उपक्रमा मुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून चांगले आणि दर्जेदार विद्यार्थी तयार होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन फलटण चे नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे यांनी केले.

मुधोजी काॅलेज चे मराठी विभागप्रमुख प्रा डाॅ प्रभाकर पवार दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर सरपंच काशिनाथ शेवते आदींची प्रमुख पाहुणे उपस्थिती होती.

स्पर्धे च्या युगात उच्चशिक्षित विद्यार्थी निर्माण होत असताना आणि नवनवीन क्षेत्रात संधी निर्माण होत असताना मुलांनी आपल्या कुटुंबातील नाते टिकवणे गरजेचा आहे शहरी भागात नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत चालला आहे मात्र ग्रामीण भागात समाधानकारक स्थिती असल्याचे प्रा डाॅ प्रभाकर पवार यांनी स्पष्ट केले विद्यार्थ्यांनी आपला दर्जा उत्तम तयार करावा असे आवाहन ही प्रा पवार यांनी केले

जावली ग्रामस्थांनी सतत परिश्रम घेवुन विविध उपक्रमांच्या माध्यमातून आधिकारी गावात आणुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात असल्याने गावा मधुन निश्चित अधिकारी तयार होण्यास मदत होणार असल्याचे शशिकांत सोनवलकर यांनी सांगितले

यावेळी सुरूवातीस इयत्ता दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी जावली गावामधून बदलून प्राथमिक शिक्षक तसेच जावली केंद्रशाळेत नव्याने आलेल्या शिक्षकांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी विलास दिवटे विठ्ठल ठणके प्रभारी मुख्याध्यापक रामचंद्र बागल यांनी मनोगत व्यक्त केले

विठ्ठल पडर यांनी सूत्रसंचलन काशिनाथ शेवते यांनी प्रास्ताविक सय्यद शेख यांनी अभार मानले कार्यक्रमास कोअर कमिटी अध्यक्ष आप्पासाहेब ठोंबरे विलास चवरे प्रतापराव मोरे सुरेश आढाव सयाजी बरकडे महेंद्र गोफणे बाळासाहेब चवरे वाळाभाऊ मकर शामराव निंबाळकर विलास बनकर शिवाजी मोरे विकास खांडेकर नितीन जगताप दत्तात्रय वारे सुषमाराणी जाधव सुरेश बाबर रवि झेंडे धनाजी राऊत आदींसह ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.