Your Own Digital Platform

सातारा जिल्हावाशीयांचा ज्ञानेश्वर माऊली च्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप


राजुरी : " भेटी लागी जीवा लागलीसी आस " आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा " सातारा जिल्ह्यातील बरड येथील शेवटचा मुक्काम उरकून पालखी सोहळा मार्गस्थ झाला. राजुरी येथे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी फलटण तालुका सहकारी दुध संघाचे चेअरमन धनंजय पवार, भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन डाॅ. बाळासाहेब सांगळे, उपसरपंच पै. भारत गावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे, युवा नेते योगीराज साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल खुरंगे, मफतलाल पवार, राजुरी सोसायटीचे व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

माऊलींचा पालखी सोहळा संत साधुबुवा मंदिर येथे विसावला. काही वेळाने हा पालखी सोहळा सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर आला यावेळी पालखी हस्तांतर संपन्न झाले. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख , सोलापूर चे जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक विरेश प्रभू, उपविभागीय अधिकारी शमा पवार, माळशिरस तहसीलदार सौ. माने, आ. हनुमंत डोळस, पंचायत समिती सभापती सौ. वैष्णवदेवी मोहिते - पाटील आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
तर सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी सौ. श्वेता सिंघल , पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जगताप, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, उपविभागीय अधिकारी संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजीत पाटील, फलटण ग्रामीण चे पोलीस निरीक्षक सजन हंकारे, बरड चे ए. पी. आय. संजय बोंबले, बरड सब डिव्हिजन चे सहायक अभियंता प्रमोद सोनवणे, बरड मंडल अधिकारी पवार, विस्तार अधिकारी संजय बाचल , गाव कामगार तलाठी गीरे, धेंडे, ग्रामविकास अधिकारी मोहन सुतार, डि. एस. भोसले यांच्या सह सर्व विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

यावेळी सातारा जिल्ह्याच्या वतीने दृढ अंतःकरणाने भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्यास निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सौ. श्वेता सिंघल व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

पालखी सोहळा नातेपुते संध्याकाळी विसावला. बुधवारी सकाळी मार्गस्थ होवून सदाशिव नगर चे रिंगण होणार आहे.