गद्दारांना संधी दिल्यास शिवेंद्रराजेंना महागात पडेल: ऋषिकांत शिंदेसातारा : ज्यांनी जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत स्वत:च्या स्वार्थासाठी गटाच्या उमेदवाराचा पराभव घडवून आणला अशा गद्दारांना पद देऊन त्यांचे उदात्तीकरण केल्यास निष्ठावंतांची नाराजी विधान सभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला व आ.शिवेंद्रराजेंना महागात पडेल असे मत राष्ट्रवादी पक्षाचे नेते ऋषिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. जावली पंचायत समितीच्या सभापतीपदा वरून जावली तालुक्यात सुरु असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

स्वत:ला आ.श्री.शिंवेंद्रराजेंचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणवून घेता. मग आमदारांना विधान सभेच्या निवडणुकीची भिती दाखवुन पंचायत समितीच्या सभापती पदासाठी ब्लॅक मेलींग करु नये असा सनसनाटी टोला ऋषिकांत शिंदे यांनी सुहास गिरी याचे नाव न घेता लगावला.

सभापती पद अडिच वर्षांसाठी आहे. असे असताना सव्वा वर्षांत पदाधिकारी बदल केल्यास तो त्या पदाचा अवमान आहे तसेच सव्वा वर्षात स्वतःला सिद्ध करणे नविन कार्यकर्त्याला अवघड असून असे करणे त्याच्यावर अन्याय ठरेल. जातीपातीच्या राजकारणाला जावली तालुक्यात मुळीच थारा नाही. त्यामुळे कोणी राजकीय स्वार्थासाठी जातीचे राजकारण करु नये. एकीकडे आपण आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या अगदी विश्वासातील असल्याचे भासवायचे आणि दुसरीकडे विधानसभा निवडणुकीची भिती दाखवून सभापती पदाची मागणी करायची.यालाच 'मुंह मे राम अन् बगल मे छुरी ' असं म्हणतात. मग हे आमदारांवर बेगडी आणि पुतना मावशीच प्रेम आहे का असा सवालही  त्यांनी केला. अशीच भिती गतवेळीही दाखवून अशा संधी साधुंनी खुल्याप्रवर्गासाठी आरक्षण  असताना  सभापती पद लाटले होते. आता तीच पुनरावृत्ती होणार असेल तर त्याची किंमत पक्षाला व आमदार शिवेंद्रसिंहराजे ना  मोजावी लागेल. असा इशारा यावेळी ऋषिकांत शिंदे यांनी दिला.

No comments

Powered by Blogger.