Your Own Digital Platform

शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात पाटणमध्ये ४०० लिटर दूध रस्त्यावर


पाटण :
दूध दरवाढीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनास पाटण तालुक्यात सोमवारपासून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनास मंगळवारी गालबोट लागले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास निसरे येथे पाटण येथील सकस दुध डेअरीचे दुध वाहतूक करणाऱी दोन वाहने कराड-चिपळून रस्त्यावर अडवून वाहनातील प्रत्येकी ४० लिटरचे १० कॅनातील सुमारे ४०० लिटर दूध रस्त्यावर ओतले.

दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनास पाटण येथील तालुका दुध संघासह सकस दुध डेअरीने सुद्धा पाठींबा दिला होता.

दरम्यान मल्हारपेठ पोलिसांनी सबंधित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सुशांत जाधव,विजय पाटील यांच्या सह अन्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेवर गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान संघटनेचे पाटण तालुकाध्यक्ष विकास हादवे यांनी गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर आंदोलन काळात शांतता राखावी असे आवाहन अध्यक्ष विकास हादवे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.