Your Own Digital Platform

पळसावडेनजीक जमीन भेगाळल्याने वाहतूक ठप्प


परळी : पांगारे, पळसावडे-सांडवली रस्ता पळसावडे धरणावर सुमारे 3 फूट खचला असून सांडवलीकडे जाणारी वहातूक गेल्या 4 दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. परळी खोर्‍यात पावसाची संततधार कायम असून पडझडीच्या घटना घडत आहेत. सांडवली, वारसवाडी, गणेशवाडी, पळसावडे, बोंडारवाडी, मोरबाग, कारगाव, दावण व दत्तवाडी येथील गावकर्‍यांचा दळण-वळणाचा मार्ग बंद झाला आहे. पांगारे,पळसावडे लघूपाटबंधारे तलाव ओव्हरफ्लो झाले असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे .

पाण्याच्या प्रवाहाने तसेच अतिवृष्टीमुळे पांगारे पळसावडे रस्ता अनेक ठिकाणी भेगाळला आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. अजूनही या परिसरात अतिवृष्टी सुरू आहे.