आमच्या गावाला पुर्णवेळ तलाठी मिळेल काहो..तलाठी..


लोणंद : खेड बु!ता. खंडाळा हे गांव मोठे असुन या गावासाठी पूर्णवेळ गाव कामगार तलाठी मिळावा,सद्यस्थितीस शाळा प्रवेशाचे काम सुरू झाले आहे, विद्यार्थांना शाळा प्रवेशासाठी, ऊत्पन्नाचे दाखले, रहिवाशी दाखले, जातीचे दाखले मिळवणेसाठी तलाठी अण्णांची जास्त गरज असते ,सद्या असणारे तलाठी हे दिलेल्या वारास सुद्धा कायमचे हजर राहत नाहीत कधीतरी येतात व जातात त्यामुळे विद्यार्थो वर्गाच्या कामाचा खोळंबा झाला आहे, विद्यार्थी वर्ग तलाठी आण्णांची कामासाठी वाट बघत असतात, मात्र ते भेटत नसल्याने हेलपाटे मारुनच कंटाळवाणी चेहरा करुन विद्यार्थ्यांना रिकामे हाताने घरी परतावे लागत आहे, ( चौकट- खेड बु. सजा हे मोठे असल्याने त्या ठिकाणी पुर्णवेळ तलाठी असणे गरजेचे आहे, त्यातच शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने कागदपत्र पुर्तता करताना अनेक कागद तलाठी यांचेकडुन घ्यावी लागतात, तलाठी नसल्याने विद्यार्थी व नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे, लवकरात लवकर पुर्ण वेळ तलाठी देणेची व्यवस्था करावी -मा.गजेद्र मुसळे, राष्ट्रवादी प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य ) पुर्ण वेळ गाव कामगार तलाठी आमचे गावास देणे बाबतचे निवेदन खंडाळा तहासिलदार कार्यालयात देणेत आले त्यावेळी,

राष्ट्रवादी काॅग्रेस ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष व सदस्य

नवतरुण गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काॅग्रेस ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष श्री.सुनिल(दादा)रासकर, तंटामुक्ती अध्यक्ष व माजी उपसरपंच 

भगवान(आण्णा)ठोंबरे,ग्रामपंचायत सदस्य युवा नेते श्री गणेश नामदेवराव धायगुडे पाटील ,गजेंद्र मुसळे राष्ट्रवादी चे(प्रदेश सचिव - राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेस, महाराष्ट्र राज्य ),ठकसेन धायगुडे पाटील ,अंकुश जगन्नाथ धारगुडे पाटील,संतोष आबासो धायगुडे पाटील , हितेश धायगुडे पाटील-युवा संघटक,सचिन दादासो धायगुडे पाटील-युवा नेता,ज्ञानेश्वर मारुती धायगुडे पाटील,सुभाष आप्पा ठोंबरे,अरविंद बापुराव धायगुडे पाटील पंकज वाघमारे व खेड बु! चे ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.