मायणी व निमसोड चोरीप्रकरणी दोन आरोपींना अटक


मायणी: मायणी व निमसोड येथे सुमारे महिन्या-दीड माहिन्यापूर्वी दुकान फोडून लाखो रुपयांची चोरी केल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात मायणी पोलीस स्टेशनला यश मिळाले आहे.

या संदर्भात मायणी पोलीस दूरक्षेत्राकडून पत्रकार परिषदेत मिळालेली माहिती याप्रमाणे -दि. ३० मे रोजी मायणीतील प्रसिद्ध चांदणी चौकातील मायणी -वडूज या रहदारीच्या रस्त्यावरील उमेश मोरे यांच्या मालकीच्या लक्ष्मीनारायण शेती उपयोगी वस्तूंच्या विक्रीचे दुकान चोरटयांनी रात्रीच्या वेळेस शटर तोडून, सी.सी.टीव्ही. कॅमेऱ्यांचे नुकसान करुन इलेक्ट्रिक मोटर्स, स्टार्टर्स, तांब्याच्या तारा व रोख रकमेसह सुमारे नऊ लाख रुपयांची चोरी केली होती. दरम्यान अकरा जून रोजी त्याच मालकांचे निमसोड ता. खटाव येथील दुकान फोडून सुमारे तीन लाख रुपयांच्या किंमतीचा माल आरोपींनी लंपास केला होता. त्यामुळे या चोरीचा तपास पोलिसांना चक्रावून सोडणारा व आव्हानात्मक होता.

या चोरीसंदर्भात पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे,वडूजचे पो, निरीक्षक यशवंत शिर्के यांचे मार्गदर्शनाखाली गेले महिना- दिड महिना मायणी पोलीस दूर क्षेत्राचे स. पो.नि संतोष गोसावी यांनी तपास करुन त्यातील आकाश करणसिंग साळुंखे व विशाल महादेव पवार दोघेही राहणार अकलूज ( माळी नगर) यांना अकलूज येथे शिताफीने अटक करुन वडूज पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

दोन्ही गुन्हेगारांनी आपण सदर चोरी केली असल्याची कबूली दिली असून त्यांना वडूज येथील न्यायालयाने दि. १४ जुलैअखेर पोलीस कोठडी दिली आहे.
म्हसवड, टेंभूर्णी, अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत व म्हसवड पेट्रोल पंपावरील रोकड चोरीची कबूली त्यांनी पोलीसांना दिली आहे. लवकरच उर्वरीत आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास स. पो.नि. संतोष गोसावी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

सदर तपासकामी मायणी पोलीस दूरक्षेत्राचे स. पो.नि. संतोष गोसावी यांना पोलीस नाईक बापू खांडेकर, पोलीस शिपाई राघू खाडे, नवनाथ शिरकुले, गुलाब डोलताडे, विकास जाधव व प्रकाश कोळी यांचे विशेष सहकार्य लाभले.

या चोरीचा तपास यशस्वीरीत्या कोणताही पुरावा त्या करुन चोरटयांना अटक केल्याबद्दल मायणी पोलिस विभागाचे जनतेतून अभिनंदन केले जात आहे.

No comments

Powered by Blogger.