Your Own Digital Platform

छ. संभाजी महाराज मालिकेचे संगम माहुलीत शुटिंग


सातारा :  गेल्या दोन दिवसांपासून छ. संभाजी महाराज मालिकेचे चित्रिकरण सुरु आहे. त्यामध्ये संभाजी महाराज यांची भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांचा धर्मवीर युवा मंचच्यावतीने त्यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. 

यावेळी ज्येष्ठ शिवभक्त आणि संगम माहुली ग्रामपंचायतीचे सदस्य प्रकाश माने, धर्मवीर युवा मंचचे अध्यक्ष प्रशांत नलवडे, अमोल खोपडे उपस्थित होते. भीमसेन शरण राजधानी साताऱ्यात मालिका सुरु झाली तेव्हा साखर पेढे वाटून आनंद साजरा करणारी हीच ती धर्मवीर युवा मंच ही संघटना म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांनी कौतुक केले.