पालखी महामार्गावर मद्यविक्रीस मनाई


सातारा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिनांक 13 ते 17 जुलै 2018 या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. या निमित्ताने लोणंद शहरातील 13 व 14 जुलै रोजी, सुरवडी, फरांदेवाडी, फलटण शहरातील 15 ते 16 जुलै व बरड, राजुरी येथील 16 व 17 जुलै 2018 रोजी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 मधील कलम 142(1) मधील तरतुदीनुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सर्व देशी दारु किरकोळ विक्री (सीएल-3) बिअर विक्री परवाने (एफएल/बीआर-2), विदेशी मद्य विक्री (एफएल-2), परवानाकक्ष (एफएल-3) बिअरबार (फॉर्म ई ) व ताडी दुकाने या अनुज्ञप्तीची जागा व विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिले आहेत.

या आदेशाचे कोणत्याही अनुज्ञप्तीधारकाने उल्लंघन केल्यास त्याचे विरुध्द मुंबई मद्या निषेध कायदा 1949 व त्या अंतर्गत असलेल्या नियमान्वये योग्य ती कडक कारवाई केली जाईल. तसेच अनुज्ञप्ती बंदच्या कालावधीची नुकसान भरपाई दिली जाणार नाही असेही श्रीमती सिंघल यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.