Your Own Digital Platform

वैद्यकीय सुविधा व अन्नदान केंद्राचे आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते उदघाटनफलटण : श्री. संत ज्ञानेश्वरी महाराज पालखी सोहळ्यानिमीत्त फलटण येथे माऊली फौंडेशन कळंबादेवी मुंबई याचे सौजन्याने मोफत वैधकिय सुविधा व अन्नदान केंद्राचे आमदार दिपक चव्हाण यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. विश्वनाथ टाळकुटे व भक्तगण यांच्या सहकार्याने आषाढीवारी निमित्ताने माऊली फाउंडेशन मुंबईच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

फलटणमध्ये मुधोजी महाविद्यालय परिसरात आणि बाणगंगा नदीकाठी वृक्षची लागवड करण्यात आली आहे. तसेच माऊलीच्या पालखीचे आगमन फलटणला होत असताना त्यांदिवशी सकाळपासून मोफत वैद्यकीय सेवा आणि सुमारे वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले होते. बरड नातेपुते माळशिरस वेळापूर येथेही वैद्यकीय सेवा देण्यात आली असून नातेपुते येथे तर वेळापूर येथे सुमारे वारकऱ्यांना अन्नदान केले आहे.